अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील हनीफ शेख या शेतकऱ्यांच्या शेळ्यांना वरती शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी रात्री बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये चार शाळा दगावल्या असून सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमधून पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राहुरी शहरांमधून मुळानदी गेल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती उसाचे क्षेत्र आहे .याच उसाचा फायदा घेत बिबट्या दिवसा उसाच्या आडोशाला लपून बसतात .आणि रात्रीच्या वेळी पाळीव प्राण्यांवर ती हल्ला करतात .या आधीही बिबट्याने अनेक वेळा मेंढ्या, शेळ्या, वासरे ,पाळीव कुत्रे यांना आपले भक्षक बनवले आहे.
अनेक वेळा शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांना देखील बिबट्याने दर्शन दिले आहे .त्यामुळे अनेक वेळा शेतामध्ये काम करण्यास मजूर तयार होत नाही .याआधी देखील अनेक वेळा वन विभागाकडे पिंजरा लावण्यासंदर्भात मागणी केली होती. तरी देखील वन विभागाने अद्याप पर्यंत पिंजरा लावलेला नाही.
लवकरात लवकर पिंजरा लावून पाळीव प्राण्यांवर ती होणारे हल्ले थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी तलाठी कार्यालयाचे भाऊसाहेब शिरसाट, राधेश्याम यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला .व फॉरेस्ट खात्याचे वनरक्षक अधिकारी पवन निकम,
पपट शिंदे ,गोरख मोरे ,सहकारी शिवाजी गाडे आदींनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा कायमचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आयुब शेख ,जमीर आतार जुबेर आतार, अक्षय ऊडे , रामेश्वर ऊडे , पाटीलबा ऊडे ,राजू तोडमल ,सुनील शेळके, नितीन वराळे जालिंदर सांगळे आदींनी यावेळी केली.