बॅंकेच्या एटीएम ऑपरेटरला मारहाण करुन चार लाखांची रोकड लुटली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- लोणी -निर्मळ पिंपरी रस्त्यावर दिवसाढवळ्या एटीएम ऑपरेटरला मारहाण करून चोरटयांनी तब्बल 04 लाखांची रोकड लांबवली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एटीएम ऑपरेटर दिनेश वसंत गाढवे हे त्यांच्या ताब्यातील ॲक्सिस बँकेचे चार लाख रुपयांची कॅश एटीएम मध्ये लोड करण्यासाठी त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना.

त्यांच्या मोटरसायकलीच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या एका कार मधून तीन अनोळखी चोरट्यांनी येऊन त्यांची गाडी अडवली.

यावेळी या चोरटयांनी गाढवे यांना मारहाण केली व त्यांच्या ताब्यातील चार लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने ओढून नेली.

बॅगमध्ये चार लाख रुपये रोख रकमेसह एटीएमच्या चाव्या, बँकेचे कागदपत्र व फिर्यादीचे आधार कार्ड असा ऐवज होता.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डीवायएसपी मदने, पोलीस निरीक्षक भोये यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24