अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने दीड वर्षाच्या मुलीसह विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी ४ जणांना जुन्नर न्यायालयाने ५ दिवसांची पाोलीस कोठडी दिली.
अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. रंजना अविनाश तांबे (वय ३०)व श्रीशा अविनाश तांबे (वय दीड वर्षे दोन्ही रा.देवजाळी हिवरे तर्फे नारायणगाव ता.जुन्नर) अशी आत्महत्या केल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी महिलेचा पती अविनाश बंडू तांबे ,दिर संतोष बंडू तांबे ,सासरे बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे .
फिर्याद बुधा बबन ठवरे (रा.ढवळपुरी ता.पारनेर जि.अहमदनगर) यांनी दिली आहे. रंजना तांबे हीचा विवाह अविनाश बंडु तांबे याच्या बरोबर २००९ साली झाला होता.
लग्नानंतर तीन वर्षांनी रंजना हिस नवरा ,सासू,सासरे,दीर हे त्रास देवु लागले. दरम्यान,दोन वर्षापूर्वी अविनाश याने दुसरे लग्न करण्याचे ठरविले होते.
वारसदार म्हणून मुलगा पाहीजे म्हणून दुसरे लग्न करणार आहे, असे अविनाश सांगत होता. त्या लग्नाला रंजनाने विरोध केला होता त्यामुळे अविनाश हा रंजना हीस नेहमी मारहाण करीत होता.
जाचाला कंटाळून दीड वर्षाच्या मुलीसह रंजनाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे पाटील हे करीत आहेत.