अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- लांडग्याच्या हल्ल्यात चौघे जण जखमी झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील रत्नापूर गावात घडली झाले आहेत.
हा हल्ला लांडगा अथवा तरस सदृश्य प्राण्याने केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान आधीच नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून आता पुन्हा दुसरे प्राणी देखील हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथे हिंस्र बन्यप्राण्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाळासाहेब वारे, बिमल वारे, भाऊसाहेब वारे, लक्ष्मण वारे जखमी झाले.
सर्वांवर जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जामखेड ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने सर्ब जखमींना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यापूर्वी बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घालून सर्वांचीच झोप उडवली होती. आता पुन्हा एकदा तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्याने डोके वर काढले आहे.
दरम्यान रत्नापूरमधील हल्ला तरसाने केला की लांडग्याने याची ठोस माहिती वनविभाग देऊ शकलेलं नाही.