अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी शहरातील विविध टपऱ्यावर धाड टाकुन सुमारे २३ हजार रुपयाचा गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली आहे.
याप्रकरणी सात जणाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तर यातील चार जणांना अटक केली आहे, तर तिन जण पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, शहरात माव्याचा अक्षरक्ष: महापुर आला आहे.
पाथर्डीचा मावा दररोज खासगी बसमधून थेट मुंबई व कल्याण येथे जातो. शिवाय तालुक्याच्या विविध भागातही मावा पुरविण्याचे काम येथील काही युवक करीत आहेत.
गुरुवारी अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डीत छापा मारला. याप्रकरणी त्यांना समीर मुनीर शेख (इंदिरानगर), स्वप्नील राजेंद्र सरोदे (आखरभाग), सुरेश तुकाराम कोकाटे (रा.पिंपळनेर),
किशोर रतन जगधने (रामगिरीबाबा टेकडी), अक्षय गणेश विधाटे, गणेश सुनिल शिंदे, गणेश अशोक हारदे (रा.पाथर्डी) हे राज्य सरकारने प्रतिबंध घातलेल्या सुंगर्धी सुपारी पासुन मावा तयार करताना आढळले.
यामधील समीर मुनीर शेख , स्वप्नील राजेंद्र सरोदे, सुरेश तुकाराम कोकाटे, किशोर रतन यांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय गणेश विधाटे, गणेश सुनिल शिंदे, गणेश अशोक हारदे हे पोलिसांना पाहुन पळुन गेले आहेत.
त्यांच्याकडुन २३ हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नगरच्या पोलिसांना येवुन कारवाई करावी लागते, परंतु पाथर्डीचे पोलिस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न नागरीकामधुन विचारला जात आहे.