वाळू उपसा करणारे चौघे जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- नगर तालुक्यातील हातवळण शिवारात सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, एक ब्रास वाळू असा 33 लाख 4 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, बंडू शिवाजी आजबे (वय 30), नंदकुमार देवराव आजबे, नंदकुमार देवराव आजबे, रमेश बाळासाहेब घोडके, सागर बाळासाहेब घोडके या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील हातवळण शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोक अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस पथकासह तातडीने सिना नदीपात्रात छापा टाकला. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये वाहतूक करताना चौघे पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करत जेसीबी, ट्रॅक्टर जप्त केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24