अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील चार विद्यार्थ्यांची संयुक्त अरब अमिराती मधील कंपनीत निवड झाली आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्था पातळीवर सुरू केलेल्या प्लेसमेंट सुविधेच्या माध्यमातून अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
यासाठी नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी येवून विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेवून निवड करतात.या उपक्रमातून असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनीना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागातील चार विद्यार्थ्यांनी संयुक्त अरब अमिराती येथील बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली.
या विद्यार्थ्यांचा आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, प्राचार्य डी.सी.मगर, उपप्राचार्य प्रा.एस.बी.लव्हाटे, प्रा.आर.बी.निंबाळकर, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.धनंजय आहेर मॅकेनिकल विभागाचे प्रमुखऐ प्रा.आर के बेलकर प्रा.एस बी लव्हाटे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरीता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्लेसमेंटची सुविधा सुरू झाल्याने नामवंत व बहुराष्ट्रीय कंपन्या ग्रामीण भागात येवून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देत आहेतच,पण यापेक्षाही आपल्या गुणवत्तेने विद्यार्थी या मुलाखती मध्ये यशस्वी होत असल्याचे मोठे समाधान असलयाचे आ.विखे म्हणाले.