चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला ! अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- चितळी परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

चितळी गावाच्या परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह ताब्यात घेत श्रीरामपूरला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीचा मृत्यू कशामुळे झाला, याविषयी माहिती मिळू शकली नाही. परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी गावातील दोन संशयितांची नावे पोलिसांना सांगितली आहेत.

घटनेनंतर ते दोघे पसार झाल्याचे नागरिक सांगत आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाऐवजी

नगर सिव्हिल रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24