अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- जमिनीच्या व्यवहारात परस्पर नोटरी साठेखत केल्याप्रकरणी एक व्यापाऱ्यासह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

व्यापारी महेश सुमतीलाल संचेती (रा. विनायकनगर, नगर), कैलास गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, मोहन गायकवाड, नाथा गायकवाड (चौघे रा. वाळुंज) अशी आरोपींची नावे आहेत.

फसवणूक झालेले गंगाराम गायकवाड (५५ रा. वाळुंज, ता. नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गंगाराम गायकवाड व इतर हिस्सेदार यांची वाळुंज शिवारात ९. ७५ आर इतकी शेत जमीन आहे.

महेश संचती याने इतर चौघांशी संगनमत करून नगर शहरातील कराचीवालानगर येथील अ‍ॅड. भोसे यांच्या नोटरी कार्यालयात गंगाराम गायकवाड व इतर हिस्सेदारांच्या मालकीच्या शेताचे परस्पर नोटरी साठेखत तयार करून व्यवहार केला. फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रार अर्जावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात आली. यानंतर वरिष्ठांनी आदेश देताच तोफखाना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24