Free Silai Machine Yojana 2022: सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन ; जाणून घ्या  तुम्हाला मिळणार की नाही 

Free Silai Machine Yojana 2022: राज्य सरकार (state governments) असो की केंद्र सरकार (central government), दोघेही आपापल्या स्तरावर अशा अनेक योजना राबवतात, ज्यांचा लाभ गरजू आणि गरीब वर्गापर्यंत पोहोचू शकतो. या योजना ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात.

यामध्ये विद्यार्थी, पुरुष, वृद्ध आणि महिला अशा प्रत्येक वर्गासाठी योजनांचा समावेश आहे.  सरकारकडून महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना (Silai Machine Yojana) नावाची योजना चालवली जाते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही, आणि तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाते. परंतु अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिलांना ते मिळू शकते आणि कोणाला नाही.  

म्हणूनच योजना सुरू झाली
या मोफत शिलाई मशिन योजनेबद्दल बोलायचे झाले तर महिलांनी स्वावलंबी व्हावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना शिलाई मशीन मोफत दिली जात आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता असेल
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
जन्मतारीख प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
सक्रिय मोबाइल नंबर
अपंगत्व किंवा विधवा असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

कोण अर्ज करू शकतो?
वय 20-40 वर्षांच्या दरम्यान असावे
तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहात
जर तुम्ही नोकरदार महिला असाल तर तुमच्या पतीचे उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना याचा लाभ घेता येईल.

असे अर्ज करता येतील
स्टेप 1
 
प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जा.
नंतर अर्ज डाउनलोड करा

स्टेप 2
फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे आणि तुमचा फोटो जोडा
त्यानंतर संबंधित कार्यालयात जमा करा
त्यानंतर पडताळणी केल्यानंतर अर्ज योग्य आढळल्यास तुम्हाला शिलाई मशीन दिले जाते.