ताज्या बातम्या

Free Silai Machine Yojana : मोदी सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन, असा घ्या योजनेचा लाभ

Published by
Ahmednagarlive24 Office

Free Silai Machine Yojana : मोदी साकाराकडून (Modi Goverment) महिलांच्या (Womens) सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना आणत आहे. याचा फायदा देशातील लाखो महिलांना होत आहे. त्यातून महिलांना रोजगार निर्मिती होत आहे.

या योजनांमुळे देशात महिलांच्या स्थितीतही झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आज क्वचितच असे क्षेत्र असेल जिथे महिलांनी आपले अस्तित्व जाणवले नसेल. देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

केंद्र सरकार (Central Goverment) महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक मोफत शिलाई मशीन (Free sewing machine) योजना आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील महिलांना शासनाकडून मोफत शिलाई मशीन देण्यात आली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक राज्यातील ५० हजारांहून अधिक महिलांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन मोफत देण्यात येणार आहे. 20 ते 40 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्या

यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.

अर्ज करण्यासाठी, त्याच्या अधिकृत वेबसाइट www.india.gov.in ला भेट द्या.

होम पेजवर तुम्हाला मोफत शिवणकामासाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल.

अर्जाच्या PDF ची प्रिंट आउट घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि नंतर फॉर्म भरा.

तसेच आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

त्यानंतर संबंधित कार्यालयात फॉर्म जमा करा.

Ahmednagarlive24 Office