अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो.
या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात फ्रेंडशिप डे ची प्रथा आपण काही वर्षपासून बघतोय. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये मैत्रिचे उदाहरण आपल्याला श्री कृष्ण अाणि सुदामा यांच्या मैत्रीचे देता येईल ज्यात गरिब मित्राचे आत्मसंमान आहे.
आणि मित्राची मजबूरी समजण्यासाठी यात शब्दाची देखिल गरज नाही. मैत्रीचा संबंध जात-पात, धर्म, गरिब- श्रीमंती या कशासी येत नाही. मैत्रीच्या नात्याला नाही वेळेचेही बंधन असते, नाही वयाची सिमा . आयुष्यात मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते. मैत्रीच नात हे हृदयासी जोडलेल एक नितळ नात आहे.
मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो…ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मैत्री.
आपल्या आयुष्यातला खास सदस्य म्हणजे मित्र. जो आपल्या प्रत्येक, दुःख, अडचणी अशा प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत उभा असतो. परिस्थिती काहीही असो तो आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. वर्तमानमध्ये सोशल मिडियाच्या काळात फ्रेंडशिप डेची लोकप्रियता युवा पीढीमध्ये अधिक दिसून येते.
जात-पात, धर्म, रंग यासारख्या भेदभावाचा उंबरठा ओलांडून आपापसात मैत्रीचा हात पुढे करित आहे. फ्रेंडशिप डे च्या दिवशी मैत्रीच नात अधिक घटट् बनते. फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्रांना सुभेच्छा , भेट वस्तु दिल्या जातात तसेच काहीजण सामाजिक उपक्रम राबवून संदेश देखिल देतात.