Friendship Day 2021 Marathi Wishes : तुमच्या जिवलग मित्रांना अश्या द्या फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 1 ऑगस्ट दिवशी जगभर सेलिब्रेट केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जवळ असलेल्या किंवा आपल्यापासून लाखो मैल दूर असलेल्या मित्रांना फ्रेंडशिप डे शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींग्स, SMS,Images, Whatsapp Status या माध्यमांचा उपयोग करतील.

अशा वेळी फ्रेंडशिप डे ला काय मेसेज पाठवावे हे मोठे कोडच आहे. कारण मैत्री ही एक अशी गोष्ट आहे जी शब्दांत व्यक्त करता येणार नाही. तुमची हि अडचण आम्ही सोडवली आहे … चला तर मग आज डिजिटल माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा नक्कीच शेअर करूयात !

१) आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा power bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे “मित्र”. *मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐

२) 😂UR पोळी – IM तवा, UR खीर- IM रवा, UR पेढा – IMखवा, UR श्वास – IMहवा, अरे माझ्या मैत्रीच्या जिवा,आठवण काढीत जा कवा कवा!!!!😂

३) 😂तुम्हाला माहितीये का माझे मित्र कोण आहेत..? Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावर जे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र..!😂 Happy Friendship Day 😃

४) 😂तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश बोलणं जो समजून घेतो तोच खरा तुमचा Best Friend असतो! *हॅप्पी फ्रेंडशिप डे भावा* 🤣

५) ना संपणारे अखंड स्वप्न असावेत.. ना बोलता ऐकू येतील असे शब्द असावेत .. ग्रीष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत …ना मागता सोबत देतील असे मित्र असावेत… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

६) निशब्द भावनेला स्पर्शाची साथ… हळव्या मनाला आसवांची साथ ….उधान आनंदाला हसायची साथ … तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ …हॅप्पी फ्रेंडशिप डे माय बेस्ट फ्रेंड

७) Style” असं करा कि “लोक बघत” राहतील , आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील. Happy Friendship Day 💐

८) तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.. जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी.. तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी.. कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

९) मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर , डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात.

१०) फक्त दोस्ती आणि प्रेम एकदा नदीवर फिरायला जातात प्रेम नदित पडते कारण प्रेम आंधळे असते दोस्ती पण पडते कारण दोस्ती कोणाची साथ सोडत नसते

११) आमची दोस्ती “गणिताच्या Zero” सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची “किंमत” वाढते.😃 Happy Friendship Day Bro..देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. Best friend ला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

१२) प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त पटवण्यासाठी बोलत नसतो, कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा बहीण मिळावी म्हणून बोलणारे सुद्धा असतात. माझ्या लाडक्या मैत्रिणीला फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा.

अहमदनगर लाईव्ह 24