अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- जगात सर्वात सुंदर आणि खास नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं ! मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे. म्हणूनच मैत्रीचे प्रतिक म्हणून ‘फेंडशिप डे’ साजरा केला जातो. इतर सणवार तारखेनुसार किंवा तिथीनुसार साजरे केले जातात.
मैत्रीचा सण मात्र ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो १९३५ मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता.
त्या निर्दोष व्यक्तीचा जीन घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेन्डशिप डे वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो. तर काही जागांवर हा डे पहिल्या रविवारी नाही तर २ तारखेला हा डे साजरा करतात. ओहायोच्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो.
१९९७ मध्ये अमेरिकेतील सरकारने प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर ‘विनी द पू’ याला फ्रेन्डशिप डे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर केलं होतं. २७ एप्रिल २०११ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत ३० जुलैला अधिकृतपणे ‘इंटरनॅशनल फ्रेन्डशिप डे’ साजरा करण्याची घोषणा केली होती.
काही देशांमध्ये मात्र फ्रेंडशिप डे वेगळ्या ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा न करता इतर दिवशी साजरा केला जातो. ८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ३० जुलै २०११ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा करण्यात आला होता.
ब्राझील ,अर्जेंटीना, इक्वाडोर आणि उरुग्वे या देशांमध्ये २० जुलैला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये मैत्रिचे उदाहरण म्हणून श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा दाखल दिला जातो. टेक्नॉलॉजीच्या या युगात मैत्रीची परिभाषा बदलली आहे. मात्र असं जरी असलं तरी अनेकजण वेळात वेळ काढून आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून हा विशेष दिवस साजरा करतात.