फोरव्हीलर पासून तर लॅपटॉप पर्यंत या तीन सरकारी साईटवर मिळतोय 80% डिस्काउंट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार गरजाही बदलत चाललेल्या आहेत. स्वतःची कार हवी, स्वतःचे वाहन हवे अशी स्वप्न आता अनेक जण पाहत आहेत. नवनवीन लॅपटॉप, स्मार्टफोन यांची तर क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोक हजारो रुपये खर्च करून आपली हौस भागवतात. परंतु असे अनेक लोक आहेत की जे आपली इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. कारण त्यांचे आर्थिक बजेट अपुरे असते. अशा लोकासांठी ही बातमी अगदी खास आहे.

जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही महिंद्र थार फक्त 1 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता तर ? फक्त 6,500 रुपयांमध्ये स्कूटी तुमची होऊ शकते तर ? कदाचित तुमच्यासाठी यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. तुम्ही थार पासून ते अगदी महागड्या गोष्टींवर 60 ते 80 टक्के डिस्काउंट मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊव्यात –

ऑनलाईन, बसल्या जागेवर कमी किमतीत मिळतील वस्तू

लॅपटॉप, मोबाईल फोन, थार, कार आदी वस्तूंवर तुम्हाला ६० ते ८० टक्के सूट मिळू शकते. यासाठी तुम्हाला कोणत्या दुकानात किंवा शॉपवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ते विकत घेऊ शकता. खरं तर त्याच असं आहे की, बँकेच्या कर्जाची पूर्तता न झाल्यास किंवा कस्टमद्वारे माल जप्त झालेला असल्यास या मालाचा लिलाव केला जातो.

तीन सरकारी साइट्स आहेत जिथे ऑनलाइन लिलाव केले जातात. यामध्ये तुम्ही जर खरेदी केले तर तुम्हाला जवळपास ६० ते ८० टक्के स्वस्त माल खरेदी करता येतो. अनेक लोक याचाच लाभ उठवत असतात.

वेबसाईट बाबत अधिक माहिती

तीन सरकारी साईट्स आहेत की जेथे लिलाव आयोजित केला जातो. यांचे पहिल्या क्रमांकावर येते www.eauction.gov.in ही साईट. त्यानंतर www.eauctionsindia.com, www.mstcecommerce.com या दोन साईट देखील आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या किंवा कस्टम्सने जप्त केलेल्या मालाचा लिलाव या साईटवर होतो. तेथून ते आपल्याला खरेदी करता येते. त्यामुळे तुम्ही काही खरेदी करायचे असेल तर या साईटवर जा, लिलावात भाग घ्या व स्वस्तात वस्तू खरेदी करा.