हॉटेल बाहेरून बंद आतमध्ये मात्र सर्रास पार्ट्या सुरु…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने निर्बंध कडक लागू केले आहेत. शनिवार व रविवार पूर्णत: विकेंड लॉकडाऊन आहे.

इतरवेळीही हॉटेलमध्ये ग्राहकांची ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचा नियम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने प्रशासनाने दुपारी चार वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसाय व व्यवहारांना बंदी घेतलेली आहे.

दारू विक्रीचा परवाना असलेल्या हॉटेल चालकांकडून मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. नगर शहर व परिसरातील बहुतांशी हॉटेल चालक सायंकाळी चार वाजता दार बंद करतात.

आतमध्ये मात्र सर्रास पार्ट्या रंगलेल्या दिसतात.दारू विक्री करणाऱ्या काही हाॅटेलमध्ये मात्र दिवसासह रात्रीही गर्दी पाहावयास मिळत आहे.

विशेष करून, महामार्गावरील हॉटेल चालकांकडे उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

त्यामुळे काही हॉटेल लॉकडाऊनमध्येही हाउसफुल झाल्याचे दिसत आहेत. नगर-पुणे महामार्ग, नगर-औरंगाबाद,

नगर-कल्याण, नगर-दौंड व नगर-मनमाड या महामार्गावरील हॉटेलमध्ये तर रात्री बारा ते एकपर्यंत पार्ट्या रंगलेल्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत कसा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24