अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-शिर्डीमध्ये एका हॉटेल मालकाचे दुसर्या हॉटेल मालकाशी वाहन पार्कींगच्या मुद्द्यावरून वाद झाला. तसेच या दोघांमध्ये थेट हाणामारी देखील झाली.
याप्रकरणी रेस्टॉरंट मालकाविरुद्ध व साथीदारांविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीमधील साईबाबा इंटरनॅशनल हॉटेल मालक किशोर आहुजा यांनी बबलू लोकचंदानी यांना रेस्टॉरंट चालविण्यास दिले आहे.
त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणारे गिर्हाईकाची गाडी हॉटेलसमोर लावली असता हॉटेल मालक आहुजा यांनी हॉटेल जवळील रेस्टॉरंट चालकाला येथे गाडी का लावली? असे जाब विचारून दम दिला की तू इथे रेस्टॉरंट कसे चालवतो? तुला बघतो त्यावर रेस्टॉरंट चालवणारा म्हटला की, मी तुला भाडे देतो,
रेस्टॉरंटमध्ये येणारे गिर्हाईक गाडी कुठे लावणार? त्यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी हॉटेल साई इंटरनॅशनलचे व्यवस्थापक नायर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून बबलू लोकचंदानी,
राहुल लोकचंदानी, चंद्रकांत खिलारी, साजिद यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात बबलू लोकचंदानी,
राहुल लोकचंदानी, चंद्रकांत खिलारी, साजिद यांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रविण दातरे करीत आहेत.