अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-गुुरुवारपासून (१ एप्रिल) देशांतर्गत हवाई प्रवासासाठी प्रवाशांचे भाडे ४० रुपयांनी वाढवण्यात आलेय. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ११४.३८ रुपये द्यावे लागतील.
सप्टेंबर २०२० मध्ये विमानतळाची सुरक्षा फी १५० रुपयांवरून १६० रुपये म्हणजे १० रुपयांनी वाढवण्यात आली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ते ४.९५ डॉलरपासून वाढून ५.२० डॉलरपर्यंत वाढवण्यात आली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हवाई तिकिटांत विमानतळ सुरक्षा फी वाढवली. विमानतळ सुरक्षा शुल्कासाठी स्थानिक प्रवाशांकडून २०० रुपये जमा केले जातील. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागतील.
हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू होतील. विमानतळ सुरक्षा शुल्क दर ६ महिन्यांनी सुधारित केले जाते. पूर्वी आम्हाला १६० रुपये द्यायचे होते, पण आता त्यात वाढ करण्यात आलीय. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ५.२० डॉलर वाढवण्यात आले.
१ एप्रिलपासून विमानतळ सुरक्षा फी वाढल्यामुळे आपली हवाई तिकिटे महाग होऊ शकतात. प्रत्येक प्रवाशाकडून ही फी आकारली गेली असली तरी काही प्रवाशांना यातून सूट देण्यात आलीय.
यात २ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारक, ऑन ड्युटी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
यासह जर दुसऱ्या कनेक्टिंग विमानाने पहिल्या उड्डाणानंतर २४ तासांच्या दुसरे विमान पकडायचे असल्यास विमानतळ सुरक्षा शुल्क प्रवाशांकडून वसूल केले जात नाही.
विमानतळावर एकही व्यक्ती मास्कविना प्रवेश करणार नाही, याची जबाबदारी आता CISF कडे देण्यात आली आहे. सोबतच एअरपोर्ट मॅनेजर/टर्मिनल मॅनेजर प्रवाशाने मास्क योग्यरित्या लावला आहे की नाही, याचीही पाहणी करतील.