अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे व ती सुरूच आहे. त्यामुळे या वाढत्या महागाई विरोधात जामखेड येथे चक्क मोटारसायकलचीच अंत्ययात्रा काढली.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधकांकडून दररोज वेगवेगळे आंदोलन केले जात आहेत. मात्र जामखेउ तालुक्यात केलेले हे आंदोलन आगळेवेगळे ठरले.
येथे तिरडीवर चक्क मोटारसायकल ठेवून त्याला पुष्पहारघालून त्या मोटारसायकलची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ती तहसील कार्यालयापर्यंत आनून कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्रातील भाजप सरकारने जनतेच्या आशेवर पाणी फिरविले असून, सहा वर्षांत नोटबंदी, जीएसटी यांसारखे जनसामान्यांविरोधी निर्णय घेतले.
शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी तसेच बेरोजगारी निर्मुलनात व महागाई कमी करण्यात केंद्रातील सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.