अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- चोरी, दरोडे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार तसेच औरंगाबाद येथील दरोडाच्या गुन्हयात सुमारे एक वर्षापासून फरार असलेला आरोपी समीर शब्बीर शेख याच्या राहुरी पोलिसांनी दिनांक २४ जुलै रोजी मोठ्या शिताफिने मुसक्या आवळून गजाआड केले.

तसेच त्याला औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. दिनांक २४ जुलै रोजी मध्यरात्री अडिच वाजण्याच्या सुमारास पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव, हवालदार प्रभाकर शिरसाट,

पोलिस शिपाई गणेश फाटक चालक बोडखे हे गस्त घालत असतांना राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील देवळाली प्रवरा येथील डेपो चौक ते दवनगाव जाणारे रोडवर शिक्षक कॉलनी देवळाली प्रवरा येथे एक तरूण संशयीत रित्या मिळुन आला.

त्याला पोलीस पथकाने हटकले असता तो पळू लागला. यावेळी त्याला पोलिस पथकाने पाठलाग करुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. आणि राहुरी पोलीस ठाण्यात आणले. त्याचेकडे विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला.

परंतू त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे नाव समीर शब्बीर शेख, वय २१ वर्षे, राहणार खटकाळी, ता. राहुरी. असे असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने औरंगाबाद येथे दरोडा टाकण्याच्या तयारीच्या गुन्हयात फरार आहे.

असे कबुल केले व तो आज जबरी चोरी करण्याच्या उदेशाने परिसरात फिरत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करुन जिन्सी पोलीस ठाणे, औरंगाबाद यांना कळविण्यात आले आहे.

दुपारी उशिरापर्यंत आरोपी समीर शेख याला औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम सुरू होते. सदरची कामगिरी ही उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,

पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव, हवालदार प्रभाकर शिरसाठ, पोलिस शिपाई गणेश फाटक, चालक बोडखे यांनी केली आहे. या कारवाई बाबत राहुरी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24