फरार लाचखोर तिघा पोलिसांचा अटकपूर्व जमीन फेटाळला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- वाळू व्यावसायिकाकडे 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या तीन कर्मचार्‍यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.

शेवगाव पोलीस उपविभागीय कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तिघा पोलिसांवर लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात ३ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वसंत कान्हू फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

गुन्हा दाखल होताच हे तिघे पसार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या पोलीस कर्मचार्‍यांनी वाळू व्यावसायिकाकडे 15 हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत त्या व्यावसायिकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पोलीस पसार झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पसार असलेल्या पोलिसांनी अटकपूर्वसाठी न्यायालयात अर्ज केला होता.

त्यावर सुनावली झाली. यावेळी लाचलुचपत विभागाचे तपासी अधिकारी व सरकारी वकिलांनी आरोपींना अटकपूर्व जामीन न देण्यासाठी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. दरम्यान लाचलुपत विभागाकडून त्या कर्मचार्‍यांचा शोध सुरू आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24