प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता चार कोटींचा निधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-   महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता ४ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील म्हणाले, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

जिल्हा परिषद वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकामासाठी चार कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे.

यामुळे तळेगाव येथील जुन्या इमारतीच्या शेजारी नवी भव्य प्रशस्त इमारत होणार असून या इमारतीतील सर्व कर्मचारी, अद्ययावत यंत्रणा, स्वतंत्र वॉर्ड व्यवस्था, अतिदक्षता विभाग, पार्किंगसह सुशोभीकरण केले जाणार आहे.

तसेच पुढे बोलताना गोडगे म्हणाले कि, मंत्री थोरात हे राज्य पातळीवर महसूल विभागाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहे.

सर्वत्र कोरोना संकट असतानाही तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखताना इंद्रजीत थोरात व यशोधन कार्यालय यांच्या सततच्या पाठपुराव्याच्या सहकार्यातून विविध वाड्या-वस्त्या, आदिवासी, दलित वस्त्या यासाठी यांच्या विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24