अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील विमानतळासाठी आता भरीव निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिर्डी विमानतळाच्या विकासकामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सरकारने २५.६० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.
विमानतळांच्या विकासासाठी १२८ कोटींचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित ५.२५ कोटी इतका निधी शिर्डी येथील विमानतळासाठी व २.२५ कोटी इतका निधी अमरावती विमानतळ,कोल्हापूर, सोलापूर गोंदिया येथील विमानतळांसाठी एकूण ५७.६२ कोटींचा निधी कंपनीस वितरीत करण्यात आलेला आहे.
आता शिर्डीसाठी ५.९८ कोटी, अमरावतीसाठी ६.४५ कोटी,पुण्यासाठी ३.५० कोटी तसेच आरसीएस योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या विमानतळांसाठी ९.६७ कोटी असा एकूण २५ कोटी ६० लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात येत आहे.