अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या महामारीत दिवसाला अनेक जणांचा मृत्यू होत आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी अंत्यविधीसाठी नंबर लागत असल्याने जिल्हाधिकारी यांनी देवळाली नगर पालिका हद्दीत व जवळ पासच्या 32 गावातील कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्याचे आदेश काढले त्यानुसार देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वैकुंठभुमित 9 दिवसात 9 अंत्यविधी करण्यात आले आहे.
त्यामध्ये राहुरी तालुक्यातील तांबेवाडी मांडवे,वांबोरी,नवनागापूर,मोकळओहळ,देवळाली प्रवरा येथील तीन आदी गावातील व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत हे अंत्यविधीच्या वेळी स्वतः उपस्थित राहुन अंत्यसंस्कार पार पाडले जातात.
अंत्यसंस्कार करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश मोटे यांच्यासह अमोल दातीर,नानासाहेब टिक्कल ,सुरेश चासकर,कृष्णा महांकाळ आदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष अंत्यविधी करण्यासाठी सोमनाथ सुर्यवंशी,भाऊसाहेब बर्डे,संतोष सरोदे,रवि गंधमवार,अनिल पंडीत,किरण मकासरे, भारत साळुंखे,अशोक पंडीत,बबन शिंदे,सुनिल कल्हापुरे आदी सहभागी असतात.
कोरोना महामारीत रुग्णांना नातेवाईक असतानाही त्यांना मृतदेहाला हात लावता येत नाही. आम्ही माणसे आहोत, आमच्या ही मनात भितीचा संशयकल्लोळ जमा होतो.परंतू नोकरी करायची म्हटल्यावर कर्तव्य करावेच लागते.
अंत्यसंस्कार करीत असताना मनात नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण होतात.सुरवातीला भिती वाटली परंतू दररोज एक दोन मृतदेह अंत्यसंस्कासाठी येवू लागल्याने मनातील भिती दुर झाली.पण आमच्या बद्दल कुटुंबात भिती निर्माण झालीआहे.
कुटुंबातील व्यक्ती परक्या प्रमाणे राहतात. परंतू आम्ही सहा व्यक्ती मृतदेह घेवून आलेली रुग्णवाहीणी सँनिटायझर केली जाते.
आम्ही सर्वजण पी.पी.किट घालुनच मृतदेह आंत्यसंस्कारासाठी घेतो.नातेवाईकांसमक्ष वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात.त्यामुळे अंत्यसंस्कार करणाऱ्या सहा जणांनी स्वतंञ खोली घेवून राहत आहे.