अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- जिल्हा परिषदेचे पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासा तालुक्यातील मुळाथडी परीसरातील अंमळनेर-निंभारी हा 40 वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता वहिवाटीकरिता खुला करण्यात आला आहे.
यावेळी गडाख यांचे हस्ते नारळ वाढवून रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी कार्यक्रमास राहुल माकोणे,
अंमळनेरचे सरपंच अच्युत घावटे, चंद्रकांत टेमक, मुळाचे संचालक दामोधर टेमक, पोलीस पाटील अनिल माकोणे, भाऊसाहेब भाग्यवंत, सतिश फुलसौंदर, भगिरथ जाधव, लक्ष्मणराव कोरडकर, राधाकृष्ण जाधव,
आत्माराम जाधव, आप्पासाहेब जाधव, पांडूरंग जाधव, व्यंकटराव शिरसाठ, खंडेराव शिरसाट, गोरक्षनाथ जाधव, भरत जाधव, भिमराज जाधव, हरिभाऊ वाकडे, गुलाब जाधव, राजू वाकडे सह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सभापती सुनील गडाख म्हणाले की, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात काम सुरु असून मागील काही दिवसांपासून खरवंडी गटात मोठ्या प्रमाणावर काम सुरु झाले आहे.