अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस चोरटे, भामटे हे आपल्या क्षेत्रात अपडेट होताना दिसत आहे. चोरी लुटमारी करून पैसे, ऐवज मिळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मात्र या घटनेत भामट्यानी सर्व गोष्टी बनावट करत शहरातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रकार हाणून पडला आहे.

तसेच पोलिसांना या टोळीचा छडा लावून चौघांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तेजस प्रमोद मोगले (वय ३२ रा. सिडको महानगर औरंगाबाद), शुभम रमेश नंदगवळी (वय २६ रा. गुलमंडी, औरंगाबाद),

अमोल सतीश सोनी (वय ३३ वर्षे रा. बसवंत नगर देवळाई, औरंगाबाद) व सतिष बापु खांदवे (वय २७ रा. वाकोडी, नगर) या चौघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी ककि, आरोपींनी नगर शहरातील एका डॉक्टरच्या नावाने प्रथम एका मोबाइल कंपनीकडून सिमकार्ड मिळविले. त्या आधारे त्या डॉक्टरांच्या नावानेच इ मेल आयडी तयार केला.

मग कर्जप्रकरणासाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे तयार केली. ती मेलद्वारे बजाज फायनान्स कंपनीकडे पाठवून पन्नास लाखांच्या कर्जाच्या मागणी केली.

कंपनीकडून ही माहिती खऱ्या डॉक्टरांना समजली. त्यानंतर आपल्या नावाने कोणी तरी हा प्रकार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

सायब क्राइम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांना तो मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडीच्या आधारे तांत्रिक तपास सुरू केला. त्यातून या आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना अटक करून चौकशी केली. आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल आणि अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24