अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- नियम न पाळल्याने कोरोना वाढत आहे. कोरोना राेखण्यासाठी गावात जनजागृती केली, दवंडी पिटवली.
मात्र तरी देखील ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत आिण पारावर घोळक्याने ग्रामस्थ गप्पा मारतात.
अशा गप्पीष्ट ग्रामस्थांसमोर साष्टांग दंडवत घालून नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे हे गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत.
सरपंचांचा हा अभिनव प्रयोग कामाला ग्रामस्थ बाहेर न फिरता, काेरोनाचे नियम पाळू लागले आहेत. कामरगाव येथील नागरिक लॉकडाऊन काळातही आपल्या सवयी सोडायला तयार नाहीत.
नागरिक पारावर बसून गप्पा मारणे, पत्ते खेळणे, मोबाइलवर गेम खेळत बसतात. भाजी आणि किराणा दुकानात गर्दी, वेशीजवळ, अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत.
सध्या या गावातील २५ ते ३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दहा-बारा जण अद्याप उपचार घेत आहेत. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही.
सरपंच कातोरे हे स्वत: ही नागरिकांना विनाकारण फिरू नका, गर्दी करू नका, असे आवाहन करत आहेत. मात्र ग्रामस्थ एेकायलाच तयार नाहीत.
यावर उपाय म्हणून सरपंच कातोरे यांनी गांधीगिरी करत पारावर गप्पा ग्रामस्थांसमोर साष्टांग दंडवत घालून घरी जाण्याचे आवाहन केले. ही गांधीगिरी चांगलीच उपयोगी आली. त्याचा फायदा होत आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे.
त्यासाठी नियम करण्यात आलेले असले करी आपली आपण काळजी घेणे कधीही योग्य आहे. जोपर्यंत लोकांच्या मनातून बदल होत नाही, तोपर्यंत कायदे आणि नियमांचाही उपयोग होत नाही. त्यासाठी ही शक्कल लढवल्याचे सरपंच कातोरे यांनी सांगितले.