Ganesh Chaturthi 2022 ….पुढच्या वर्षी केव्हा असेल गणेशोत्सव?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात :-

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.

गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला.

श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते.

सन २०२२ मध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सव कधी असेल?

भाद्रपद महिना प्रारंभ: रविवार, २८ ऑगस्ट २०२२

हरितालिका तृतीया पूजन: मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२

गणेश चतुर्थी: बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२

अनंत चतुर्दशी: शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०२२