Ganeshotsav: कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. या विरोधात दाखल झालेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली. यापूर्वी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाने ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारताना हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचा आदेश दिला.
त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्यात आली. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री या प्रकरणावरील सुनावणी पार पडली.
कर्नाटक वक्फ बोर्डाने वर्षानुवर्ष या मैदानात ईदची नमाज अदा केली जात असल्याचे म्हटले होते. कर्नाटक सरकारने वक्फ बोर्डाच्या या दाव्याला विरोध करत म्हटले की,
सरकारला ईदगाह मैदानात पूजा करण्यास परवानगी देण्यापासून रोखता येणार नाही. हा युक्तिवाद मान्य करण्यात येऊन काही अटींवर परवानगी देण्यात आली.