स्प्रिंकलर चोरांची टोळी सक्रिय; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एका शेतकऱ्याच्या नवीन विकत घेतलेल्या स्प्रिंकलरच्या 8 गणची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे.

विशेषबाबा म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी गणेश शिंदे, धनंजय ढोबळे यांच्यासह नाऊरचे शेतकरी जमीन वैजापूर हद्दीत असलेले शगिर पटेल यांच्या शेतातील स्प्रिंकलर गणची चोरी झाली होती.

नुकतेच शेतकरी नारायण दामोदर देसाई यांचा गट.नं. 140 मध्ये शेतकरी केशव वामन देसाई यांच्या स्प्रिंकलरची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान अद्याप त्या चोरांचा तपास लागला नसून पुन्हा नव्या सेटची चोरी झाल्याने स्प्रिंकलर चोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील शेतकरी केशव वामन देसाई यांनी स्व. मालकीचा दोनच दिवसांपूर्वी नवा स्प्रिंकलर सेट खरेदी केला होता.

पिकांना पाणी द्यायचे म्हणून या शेतामध्ये सेट लावला होता. रात्री 11. च्या सुमारास शेतामध्ये लावलेले स्प्रिंकलरचे आठ गण व्यवस्थित होते.

मात्र पहाटेच्या सुमारास केशव देसाई यांचा मुलगा शेतात आला असता सदर गणची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याने यासंदर्भात तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office