अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-शहरात धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
तिघा चोरट्यांना सिन्नर येथे अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संगमनेर येथील शान कार शोरुममध्ये दिनांक 2फेब्रुवारी रोजी एक लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
या चोरीचा तपास सुरु असताना चोरटे सिन्नर तालुक्यातील असल्याचे पोलिसांना समजले. शहर पोलिसांचे पथक सिन्नर येथे पोहचले.
तेथे सिन्नर पोलिसांच्या मदतीने चोरटे जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता अकोले हद्दीतील मोबाईल शॉपी फोडून २ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचीही या चोरट्यांनी कबुली दिली.
ह्यूंन्डाई शोरुममध्येदेखील कॅश कांऊटरमधून रोख रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून ७ मोबाईल, एक बजाज कंपनीची २२० सी.सी.ची मोटारसायकल हस्तगत केली आहे.
चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक निकिता महाले व सहाय्यक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस नाईक विजय खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, प्रमोद गाडेकर, शरद पवार
, सचिन उगले, सुभाष बोडखे, फुरकान शेख, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे.
चोरटे सिन्नर तालुक्यातील शिंवडे येथील असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये विजय सुदाम कातोरे (वय २०), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय २१), विजय सखाराम र्गिहे (वय २०) यांचा समावेश आहे.