जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय; पोलीस मात्र निर्धास्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगारी वाढू लागली असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे. जिल्ह्यात सगळीकडेच चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे.

यातच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातच कोरोना सह चोरटयांनी देखील कहर केला आहे. शेवगाव तालुक्यातील शिंगोरी, ठाकूर निमगाव येथे दरोडेखोरांनी रविवारी रात्री उशीरा ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान धुमाकूळ घालत दोघांना मारहाण केली.

यावेळी त्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, बंदुकीची काडतुसे असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी रात्री उशीरा शिंगोरी येथील ज्ञानदेव कोंडीबा चेमटे यांच्या राहत्या घराचे दरोडेखोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

कपाटातील आठ तोळे सोने व 25 हजार रुपयांची रक्कम व बंदुकीची चार जिवंत काडतुसे दरोडेखोरांनी लंपास केली. त्या ठिकाणापासून काही अंतरावरील धोंडीराम चेमटे यांच्या घरात प्रवेश करून तीन ते चार हजार रुपये लंपास केले.

दरोडेखोरांनी पुढे बाळासाहेब मारूती बोडखे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला तो अयशस्वी झाला. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात ज्ञानदेव कोंडीबा चेमटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरोड्याची दुसरी घटना ठाकूर निमगाव येथे घडली.

जनार्धन भीमराज निजवे यांच्या घरी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत जनार्धन निजवे व त्यांची पत्नी छाया यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

बळजबरीने त्यांच्या गळ्यातील आठ ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला जनार्धन निजवे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24