नगर पुणे महामार्गावर ठिकठिकाणी निर्माण होतायत कचराडेपो

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नगर-पुणे महामार्गावरील नगर-शिरूर दरम्यान सर्वच ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, मटन व्यावसायिक, औद्योगिक वसाहतीचे टाकाऊ मट्रेल व काही केमिकल कंपन्यातील टाकाऊ केमिकल रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेने टाकून दिले जाते.

यामुळे नगर पुणे महामार्गावर ठिकठिकाणी कचराडेपो झाले आहेत. सुपा कामरगाव हद्दीच्या सिमेवर मासे, मांसवाले टाकाऊ मटेरियल टाकतात तर पवारवाडी घाट व जातेगाव घाटात नेहमीच खराब केमिकलचे टँकर खाली केले जातात.

या दोन्ही ठिकाणी वन क्षेत्र असल्याने जंगली प्राणी आहे. कित्येक वेळा या जंगली प्राण्यांनी पाणी समजून रात्रीच्या अंधारात जीव गमावला आहे.

महामार्गावर काही ठिकाणी म्हणजे सुपा कामरगावच्या सिमेवर सुपा पवारवाडी घाटात सुपा टोलनाका परीसरात. जातेगाव घाट व बेलवंडीफाटा गव्हानवाडी या ठराविक ठिकाणी तर डंपिंग ग्राऊंड असल्याप्रमाणे कुणीही येतात आणि कचरा टाकून जातात.

यामुळे परिसरातील प्राणी पशु पक्ष्यांसोबतच नागरिकांचे देखील आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे हि समस्यां प्रशासनाने तातडीने सोडवावी अशी मागणी होऊ लागली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24