अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे येथे असलेले टाटा इंडिकॅशचे एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिवारी रात्री संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे येथे टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे. रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने सदर एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले.

यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची केबल तोडून टाकली. सदर एटीएम मधून १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केली.

विजय केशव थेटे ( रा. कोल्हार बुद्रुक ता. राहाता ) यांच्या अखत्यारीत हे एटीएम असल्याने शनिवारी सकाळी त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यानी पोलिसांना माहिती दिली.

याप्रकरणी विजय केशव थेटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24