अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-दोन तडीपार आरोपींकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली.याबाबत पोलिसांनी सांगितले, की तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे (रा. सूतगिरणी, ता. श्रीरामपूर) हा दुचाकीवर दोन अन्य जणांबरोबर गावठी कट्टा बाळगून सूतगिरणी परिसरात फिरत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना खबऱ्याकडून समजले.
या माहितीवरून पोलिसांनी त्यास व त्याचा साथीदार सनी विजय भोसले (वय २३, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर) एमआयडीसी ते रेणूकानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पकडले. अन्य एक जण पळून गेला.
अमित प्रभाकर कुमावत (रा. गौरव रेसिडेन्सी, बोरावकेनगर, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. आरोपीकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.