अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर , तुमच्यासाठी एक मस्त संधी सध्या आहे. एका स्पेशल ऑफरच्या मदतीने तुम्ही iPhone 11 वर जबरदस्त डिस्काउंट मिळवू शकता.
Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट iPhone 11 वर एक्सचेंज आणि बँक ऑफर देत आहेत. १२८ GB स्टोरेज असलेला iPhone 11 फ्लिपकार्टवर एक्सचेंजसह ३७,१०० रुपयांना खरेदी करता येईल.
तर, Amazon वर त्याची किंमत ४०,००० रुपये आहे. यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्स जाणून घेऊया. iPhone 11 (ग्रीन कलर) १२८ GB स्टोरेजसह ५४,९०० रुपयांना खरेदी करता येईल.
एक्सचेंज ऑफरद्वारे iPhone 11 खरेदी केल्यास तुम्हाला १७,८०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र एक्स्चेंजसह किंमतीवरील सवलत तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या फोन मॉडेलवर अवलंबून असेल.
Amazon ऑफर: येथे iPhone 11 Green Color ची किंमत ५४,९०० रुपये आहे. पण, एक्सचेंजद्वारे आयफोन खरेदी केला तर तुम्हाला १४,९०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
त्यानंतर फोनची किंमत ४०,००० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच, Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड पेमेंटवर ३२,९४० रुपयांच्या किमान खरेदीवर २३५३ रुपयांची ची इन्स्टंट सूट मिळेल.
किमान ३२,९४० रुपयांच्या खरेदीवर SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ४,००० ची झटपट सूट, ICICI बँक डेबिट कार्ड व्यवहारांवर ३२,९४० रुपयांच्या किमान खरेदीसाठी ४,००० ची इन्स्टंट सूट आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड्स व्यवहारांवर ४,००० ची त्वरित सूट दिली जाईल.
यासाठी किमान खरेदी ३२,९४० रुपयांची असावी. कोटक बँक कार्ड्सवर ३२,९४० रुपयांच्या किमान खरेदीसह ४,००० रुपयांची इन्स्टंट सूट. HSBC कॅशबॅक कार्ड व्यवहारांवर ५ टक्के झटपट सूट मिळेल. HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड्सवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल.