Recharge Plan : ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळवा डेटासह Netflix आणि Amazon Prime मोफत

Recharge Plan : अनेकजण रिलायन्स जिओची सेवा वापरतात. जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्लॅन्स ऑफर करते. यापैकी काही प्लॅन्स वापरकर्त्यांसाठी खुप फायद्याचे ठरतात.

कंपनीचा असाच एक 399 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये वापरकर्त्यांना डेटा एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा तर मिळतोच परंतु, Netflix आणि Amazon Prime सर्वकाही मोफत मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला सर्वात कमी किमतीत OTT सेवांचे सबस्क्रिप्शन मिळवण्याची संधी मिळत आहे. हा प्लॅन 399 रुपयांचा असून ज्याची वैधता 1 महिन्याची आहे. या प्लॅनची सदस्यता घेतल्यानंतर, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळते.

फायदे

वापरकर्त्यांना यामध्ये 75GB डेटा तसेच सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS मिळतात. डेटा रोलओव्हरच्या सुविधेसह येतात, म्हणजेच संपूर्ण 75GB डेटा संपला नाही तर तो पुढच्या महिन्यात फॉरवर्ड केला जातो . त्याशिवाय एकूण डेटा रोलओव्हरची सुविधा 200GB पर्यंत असते. वापरकर्त्यांचा डेटा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी दर लागू होतो.

कोणत्या सेवा मिळतात

तुम्हाला Amazon Prime चे पूर्ण 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच नेटफ्लिक्सच्या मोबाईल प्लॅनचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. इतर प्लॅन्सप्रमाणे, JioTV, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. पोस्टपेड प्लॅनमध्ये 18 टक्के GST स्वतंत्रपणे भरावा लागतो, अशा प्रकारे सर्वात स्वस्त 399 रुपयांच्या प्लॅनसाठी 471 रुपये इतका खर्च येतो.

प्रीपेड नंबर पोस्टपेडमध्ये रूपांतरित करता येतो

जर तुम्ही प्रीपेड सेवा घेत असाल तर तुम्हाला आता पोस्टपेड प्लॅनमधून रिचार्ज करण्यासाठी नवीन नंबर घ्यावा लागणार नाही. तुमचा प्रीपेड नंबर पोस्टपेडमध्ये बदलू शकता.

जिओच्या जवळच्या केंद्राला भेट देण्याशिवाय, घरबसल्या तुम्ही MyJio अॅपच्या मदतीने ही सुविधा मिळवू शकता. Airtel आणि Vi त्यांच्या पोस्टपेड प्लॅनसह स्वतंत्रपणे OTT सबस्क्रिप्शन ऑफर करतात, परंतु त्यांच्या योजना Jio च्या तुलनेत खूप महाग आहेत.