वीज समस्या तातडीने मार्गी लावा; मंत्री तनपुरेंच्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावा, अशा सूचना महावितरण व महापारेषणच्या अधिकार्‍यांना ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी दिल्या आहेत.

उपकेंद्राच्या मागणीनुसार त्यांनी सहा उपकेंद्र देणार असल्याचे सांगितले. वीज रोहित्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याने, विजेच्या बहुतांश समस्या सुटणार आहेत, असे आमदार आशुतोष काळे म्हणाले.

132 के. व्ही. उपकेंद्रावरून कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी या उपकेंद्रांना जोडण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली. अद्याप कामाला सुरवात झाली नाही. वीजबिल भरलेल्या शेतकर्‍यांना तातडीने रोहित्र मिळावे.

नादुरुस्त रोहित्र वेळेवर मिळावे. शहरात अडचणीच्या वीजवाहिन्या स्थलांतरित कराव्यात, अशा मागण्या केल्या. कोळशाच्या टंचाईमुळे कृषीपंपांचा वीज पुरवठा 10 तासांवरून आठ तास करण्यात आला होता

त्याबाबत माहिती घेऊन, पुन्हा कृषीपंपांसाठी 10 तास वीज पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.