लिंबू शेतीतून मिळवा वर्षाला 5 ते 6 लाख रुपये; जाणून घ्या उत्पादन कसे करावे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :- उन्हाळ्याची झळ जशी जाणवू लागली आहे. तशी बाजारात लिंबाची मागणीत देखील वाढ होत आहे.लिंबाचा वापर खाण्यासाठी आणि सौंदर्यासाठी केला जात आसून.

चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. तर लिंबू शेती करून कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळतो. आपल्या आरोग्यासाठी लिंबू सेवन करणे हे खूप चांगले मानले जाते.

तरी लिंबामध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध फळ आहे. तर शेतकऱ्यांनी लिंबू लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केल्या भरघोस उत्पादन घेता येणार आहे. लिंबाच्या लागवडीसाठी 20 ते 30 सेंटीग्रेड तापमानाची आणि 75 ते 200 सें.मी. पर्जन्यमान असलेल्या भागात लिंबाची लागवड चांगली होते.

तर लिंबू लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5.5 ते 6.5 दरम्यान असावे.लिंबू हे सर्व प्रकारच्या सुपीक जमिनीत घेतले जाऊ शकते, परंतु चिकणमाती उत्पादनासाठी चांगली आसते. जुलै ते ऑगस्ट या दरम्यान लिंबाची रोपे लावण्यासाठी योग्य वेळ असतो.तर लिंबाची लागवड करण्यात आधी जमीन दोन-तीन वेळा खोल नांगरट करून घ्यावी.

लागवडीआधी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे.लिंबाच्या रोपातील खड्ड्यातील अंतर हे 60 सेमी x 60 सेमी x 60 सेमी असे असावे.रोप ते रोप अंतर 5 मीटर पेक्षा कमी नसावे. लिंबाच्या लागवडीत सुधारित जातीच्या वाणांची निवड करावी. त्यामुळे उत्पादन वाढते.

तर लिंबांच्या सुधारित जाती मध्ये कागदी लिंबू, गोड लिंबू ,बारामासी ह्या जाती आहेत.लिंबू झाडांना उन्हाळ्यात 10 दिवस आणि हिवाळ्यात 20 दिवसांच्या अंतराने पाण्याची गरज आसते.

अधिक उत्पादनासाठी लिंबू झाडांना सिंचन अत्यंत आवश्यक असते. लिंबू वनस्पतींमध्ये फुले येण्यापूर्वी गांडूळ खत, शेणखत 5 किलो/झाड या दराने द्यावे. लिंबाची झाडे 10 वर्षांपेक्षा जुनी असल्यास, 250 ग्रॅम डीएपी, 150 ग्रॅम एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) एका वर्षातून एकदा देणे गरजेचे असते.

शेतकऱ्यांनी रोपांची लागवड करताना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लिंबू विविध कीटक आणि रोगांना बळी पडतात. त्यामुळे लिंबू बागायतीसाठी वेळेवर रोगाचे व्यवस्थापन करणेही अत्यंत आवश्यक आहे.

लिंबू पिकावर रोगांमध्ये कॅन्कर, ओले रॉट रोग, लिंबू तेल आणि मंद कासेचे रोग हे रोग आढळून येतात. सध्या ची बाजारातील लिंबाची मागणी पाहता लिंबाच्या बाजारभावानुसार 20 रुपये किलो पासून ते 80 रुपये किलो पर्यंत लिंबाला भाव मिळतो.

तर एका हेक्‍टरमध्ये वर्षाला 5 ते 6 लाख रुपये सहज मिळतात. लिंबू बागेतून अनेक वर्षे फळे मिळू शकतात.

Ahmednagarlive24 Office