Farming Tips: भारतात उसाची लागवड (Sugarcane cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊस उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. मात्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात उसाच्या लागवडीतील सततच्या नुकसानीमुळे उत्पादनातही घट नोंदवली गेली आहे.
या सगळ्याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कमी वेळेत जास्त नफा देणारी ऊस पिकासह अशा पिकांची पेरणी (Sowing of crops) करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ (Agronomist) देत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सह-पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जात आहे. या तंत्रानुसार शेतकरी (Farmers) एका मुख्य पिकासह शेतात अशी 4 ते 5 पिके लावू शकतात, ज्यामुळे कमी वेळेत जास्त नफा मिळेल. असे केल्याने शेतकऱ्यांच्या मुख्य पिकाचा खर्च निघेल, तसेच अतिरिक्त नफाही मिळेल.
ही पिके उसासोबत घ्या –
कृषी शास्त्रज्ञ डॉ दया श्रीवास्तव (Dr. Daya Srivastava) सांगतात की, उसासोबतच आपण लसूण (Garlic), आले, जवस आणि मेंथा पिके यांसारख्या भाज्यांची लागवड करू शकतो.
उसाचे पीक तयार होण्यासाठी 13 ते 14 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याचबरोबर काही पिकांची लागवड आणि काढणी करून केवळ 60 ते 90दिवसांतच आपल्याला नफा मिळतो.
नफा वाढेल –
प्रति युनिट क्षेत्र जास्त उत्पादन घेऊन उत्पन्न वाढवता येते. मुख्य पीक तयार होण्यापूर्वीच उसाची सुरुवातीची किंमत सहायक पिकातून काढता येते. या पीक पद्धतीत उसाबरोबरच कडधान्य पिके घेऊन जमिनीचे आरोग्य राखता येते.
जमिनीतून ओलावा, पोषक घटक, प्रकाश आणि मोकळी जागा यांचा योग्य वापर करता येतो. मजूर, भांडवल, पाणी, खत इत्यादींची बचत करून खर्च कमी करता येतो.