गरोदरपणात न घाबरता कोरोना लस घ्या …! जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांचे महिलांना आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-  गरोदर मातांनी, मी गरोदर आहे, आता मी कशी लस घेउ” असा विचार न करता “आपले कुटुंब, आपली जबाबदारी” अंतर्गत न घाबरता कोरोनाच्या लसीकरणात पुढे येण्याचे अवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले पाटील यांनी केले आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरणाची वयोमर्यादा कमी करत शासनाने १८ वर्षापर्यतच्या नागरिकांचा समावेश कोरोना लसीकरणामध्ये केला.

परंतु गरोदर मातांचे लसीकरण नियमांच्या अटीमध्ये गुरफटून गेले होते. परंतु त्यांचे आरोग्यही इतरांप्रमाणे महत्वाचे असल्याकारणाने यासंदर्भातील मागणी आणि पाठपुरावा आरोग्य विभागाकडे करण्यात आला होता.त्याअनुषंगाने आयोजित कॅम्पला भेटी दरम्यान त्यांनी गरोदर महिलांना आवाहन केले कि, गरोदर मातानी लस घेणे सुरक्षित आहे.

आपले कुटुंब आपली जबाबदारी आंतर्गत यामध्ये ईतर नागरिकाबरोबर गरोदर महिलानी देखील सहभागी होणे आवश्यक आहे कारण कोरोनाची तिसरी लाट ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा दिड पटीने अधिक प्रभावी असणार आहे. कोरोनाच्या या काळात डॉक्टरानी मदतीचा हात पुढे करत महत्वाची भुमिका बजावली असल्याचे त्या म्हणाल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24