अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण महत्वाचा टप्पा ठरू लागला आहे. यातच लसीकरणाची मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे. आपल्याही लस मिळावी यासाठी सर्वजण धावाधाव करू लागले आहे.
मात्र लसीच्या तुवड्यामुळे लसीकरण अनेकदा ठप्प होत आहे. यातच आता लसीकरण करण्यात यावे अशी मागणी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
नेवासा न्यायालयात कामकाज पहाणाऱ्या न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी वकील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण न्यायालयाच्या आवारातच करण्यात यावे अशी मागणी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव नवले यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नेवासा न्यायालयाचे कामकाज ७ जून २०२१ पासून सुरू होणार आहे. सर्व पक्षकार हजर राहणार आहे व पक्षकार हे वेगवेगळया गावातून येणार असून तसेच वकिलांना,
न्यायाधिश यांच्यासह सर्व कर्मचारी यांना सर्व पक्षकार सोबत संपर्क होणार आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.त्यामुळे सर्व न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश, वकील व त्यांचे सर्व कुटुंबीय यांचे त्वरीत कोविड प्रतिबंधक लसीकरण करावे.