ताज्या बातम्या

Geyser Alert : गीझर खरेदी करताना आणि वापरताना टाळा ‘या’ चुका, नाहीतर तुमचे होऊ शकते मोठे नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

Geyser Alert : दररोज सकाळी लवकर उठून गॅस किंवा स्टोव्हवर पाणी गरम करणे हे काम अनेकांना खूप जिकिरीचे वाटते. परंतु, तुम्ही अशा परिस्थितीत वॉटर गीझरच्या मदतीने या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. जर तुम्हालाही तुमच्या बाथरूममध्ये वॉटर गीझर लावायचा असल्यास खूप कमी किमतीत गीझर खरेदी करू शकता.

मार्केटमध्ये शानदार फीचर्स असणारे गीझर उपलब्ध आहेत. तुम्ही ते सहज घरी आणू शकता. परंतु, जर तुम्ही नवीन गीझर खरेदी करत असाल किंवा तुमच्याकडे गीझर असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नाहीतर तुम्ही खूप मोठ्या संकटात सापडू शकता.

गिझरमध्ये नक्की तपासा ही सेफ्टी फीचर्स

  • सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की गीझर चांगल्या दर्जाच्या मटेरियलने बनलेला असावा.
  • गिझरच्या गळतीमुळे वीजपुरवठा खंडित होतो.
  • गीझर प्लगमध्ये पाणी गेल्यावर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.
  • गिझरमध्ये ऑटो कटची सुविधा असावी, ज्यामुळे पाणी गरम झाल्यावर ते आपोआप बंद होते.

प्रेशर कंट्रोल फीचर तपासा

तुम्ही तुमच्या गीझरमधील प्रेशर कंट्रोल फीचर तपासून पाहिले पाहिजे. या फीचर बद्दल सांगायचे झाल्यास ते अतिरिक्त दाब हाताळते आणि टाकी फुटण्याच्या समस्या टाळते.

रेटिंग आणि पुनरावलोकने तपासून पहा

जेव्हा तुम्ही गिझर खरेदी करता तेव्हा त्याचे रेटिंग तपासा आणि पुनरावलोकने तपासून पहा. मग तुम्ही ते ऑनलाइन खरेदी करत असाल किंवा ऑफलाइन खरेदी करत असाल. हे लक्षात ठेवा की फक्त 5 स्टार रेटेड गिझर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे वीज बिल कमी होते.

विश्वसनीय ब्रँड खरेदी करा

इतकेच नाही तर गिझर खरेदी करताना तुम्ही कोणत्या कंपनीचे गिझर खरेदी करत आहात हे नक्की लक्षात ठेवा. कारण तुमच्यासाठी विश्वसनीय ब्रँडचे गिझर खरेदी करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. तसेच, हमी आणि वॉरंटी तपासून सेवेबद्दल माहिती घ्या.

Ahmednagarlive24 Office