अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-गेल्या दहा वर्षपासून कांदा मार्केट म्हणून घोडेगावची सर्वत्र ओळख झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर , राहुरी , पाथर्डी , शेवगाव , नगर या तालुक्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर , गंगापूर आणि पैठण तालुक्यातून या ठिकाणी माल विक्रीसाठी येतो.
मात्र कोरोनामुळे हे मार्केट बांध ठेवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अशी माहिती समोर आली आहे. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले घोडेगाव येथील कांदा मार्केट दोन महिन्यांनंतर उद्या सोमवारपासून पुर्ववत सुरू होणार असल्याची
माहिती मार्केट कमिटीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली. घोडेगाव येथील कांदा मार्केट मार्चएन्डमुळे जवळपास दहा दिवस बंद होते. त्यानंतर एप्रिलमध्ये एक-दोन दिवस ते चालू झाल्यानंतर पुन्हा करोनाच्या फैलावामुळे बंद करण्यात आले होते. हे मार्केट उद्या सोमवार दि. 7 जूनपासून सुरू होणार आहे.
याठिकाणी सोमवार, बुधवार व शनिवार या तीन दिवशी सकाळी 7 ते 11 या वेळेत कांद्याची आवक स्विकारली जाणार आहे. तर आवक स्विकारल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी 8 ते 11 या वेळेत कांद्याचे लिलाव होणार आहेत.
कांदा आवारात येताना शेतकर्यांना करोना नियमांचे काटेकोर पालनाची सक्ती असेल. दरम्यान जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही आहे. थोड्याच दिवसात संपूर्ण लॉकडाऊन उठल्यानंतर सध्या घातलेले वेळेचे बंधनही संपुष्टात येईल.