अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा शहरातील महादजी शिंदे, राजमाता कन्या, शारदा संकुल ज्ञानदीप व श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयातील 250 वंचित विद्यार्थांना शालेय साहित्याची अनोखी भेट सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला महादजी शिंदे विद्यालयात झालेल्या (Ahmednagar news)
कार्यक्रमात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे हस्ते शालेय साहित्य भेट अभिषेक काळे महेश काळे आकाश भोसले राष्ट्रभुषण घोडके डॉ ज्ञानेश्वर मडके या सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा तालुका माध्यमिक विभाग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार होते शैक्षणिक व सामाजिक दृष्टीने वंचित घटकांसाठी ‘अग्निपंख फाऊंडेशन’चे काम दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे प्रतिपादन प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांनी केले.
डॉ अब्दुल कलाम यांच्या विचारांप्रमाणे अग्निपंख फाऊंडेशनचे काम चालू आहे असे विचार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी व्यक्त केले.
चौकट …….
पहिल्या पंक्तीत बसणार..
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाचे धडे घेत असताना अग्नीपंख फौंडेशनने मला स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी सहकार्य सुरु आहे त्यामुळे माझ्या पंखात बळ आले आहे
माझी सुधाकर भोसले तुम्ही ज्या पहिल्या पंक्तीत बसले आहात उपजिल्हाधिकारी होऊन येत्या पाच वर्षांत त्यात पंक्तीत बसणार आहे अशी इच्छाशक्ती आदिवासी कुंटुबांतील विद्यार्थीनी रेखा काळे हीने व्यक्त केली.
प्रसंगी रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाजीराव कोरडे ,बंडोपंत धारकर वंदना नगरे, बी टी मखरे, भीमराव आनंदकर, राजेंद्र खेडकर, निवृत्ती शेलार, अविनाश शेलार शुभांगी लगड,
संदीप मुथा किसन वऱ्हाडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्नीपंखचे कोषाध्यक्ष दिलीप काटे सूत्रसंचालन विलास लबडे सचिन झगडे तर आभार उपप्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी केले.