गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो, फक्त पोरींचे फोन उचलतो’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जळगावच्या राजकारणातील कट्टर वैरी असलेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे.

या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले.

याशिवाय, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्कही साधला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली दिली.

काय आहे नेमके ऑडिओ क्लिप मध्ये? :- या ऑडिओ क्लिपमध्ये जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकचा एक तरुण पाणी नसल्याने एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार करत असतो.

त्यावर एकनाथ खडसे उत्तर देतात की, ‘जामनेरचा आमदार कुठे मेला?’ “जामनेरचा आमदार गिरीश काय करतोय तिकडे बायका मागे फिरतोय का नुसता!” त्यावर आमदार साहेब फोन उचलत नसल्याचं तो मुलगा सांगतो.

त्या मुलाने आमदार साहेब फोन उचलत नसल्याचे सांगितल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन फक्त पोरींचे फोन उचलतात, अशा प्रकारचा टोला लगावला आहे. एकनाथ खडसे यांची ही क्लिप सोशलवर व्हायरल करण्यात आली आहे.

क्लिप वायरल केल्यानंतर सोशल मीडियावर या क्लिप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मात्र यानंतर गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24