त्रास तेवढाच द्या, जेवढा सहन करू शकाल… महावितरणला दिला इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी सध्या वीज कंपनीतर्फे मोहीम सुरू आहे. यांच्या आक्रमक वसुली मोहिमेविरुद्ध मनसेने देखील आक्रमकपणा अंगिकारला आहे.

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अवाजवी बिलांची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

तसेच ‘जेवढा त्रास तुम्ही ग्राहकांना देणार तेवढा त्रास आमच्याकडून तुम्हाला होणार,’ असा इशाराच मनसेने वीज अधिकाऱ्यांना दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे तर ग्रामीण भागात कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी डीपीच बंद केले जात आहेत.

या पार्श्वभूमिवर मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीजबिल वसुली प्रश्नि मनविसेने अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदन दिले आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्य सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, सनी वैराळ, प्रमोद ठाकूर,

आदेश गायकवाड, बजरंग रणसिंग, संतोष गवते यावेळी उपस्थित होते. मनविसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

‘महावितरणचे पथके लोकांकडून सक्तीची विजबिले वसूल करत आहेत. हे तात्काळ थांबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पध्दतीने कार्यक्रम हाती घेईल.

एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहे. महावितरणने व्यवसायिक, घरगुती लाईटबील अव्वाच्या सव्वा पाठविले आहे.

लोकांच्या हाती चलन नसताना महावितरण लोकांकडून बळजबरीने वीजबिल वसुली करत आहे. आपल्यामुळे लोकांना होणारा त्रास खूप आहे.

ग्राहकांना जेवढा त्रास तुम्ही देणार तेवढा आमच्याकडून देखील तुम्हाला होणार, याची नोंद घ्यावी. असा इशारा यावेळी मनविसेने महावितरणला दिला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24