New Year Wishes 2023 : नवीन वर्षाच्या द्या हटके शुभेच्छा, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

New Year Wishes 2023 : तुमच्यापैकी अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतील. काहींनी तर या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केले जाते.

नवीन वर्ष सुरु व्हायला फक्त एक दिवस उरला आहे. या वर्षाचे स्वागत  अनोख्या पद्धतीने करा. सोशल मीडियाद्वारे तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला, नातेवाईकांना शुभेच्छा पाठवू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1.

आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो,
मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे,
कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!✨🥳

2.

स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

3.

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास,
अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ.

4.

या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.

5.

संकल्प करूया साधा,
सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

6.

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!

7.

✨💫संपणार आहे 2022
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि तुम्हाला Happy New Year 2023✨💫

8.

दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!!
Happy new year

9.

संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

10.

एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
Happy New Year

11.

✨🥳नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष,
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्य✨🥳

12.

मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

13.

नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

14.

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

15.

वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.

16.

पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

17.

🍁💐स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🍁💐

18.

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

19.

कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही.
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री
आणखी मजबूत झाली.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

20.

सरते वर्ष विसरून जावे,
नववर्षाचे स्वागत करावे,
प्रार्थना आहे आमची देवाकडे,
जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर!✨💫

21.

हे येणारे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्तम जावो,
आणि देव तुम्हाला अधिक यशस्वी करो.
या इच्छेसह, आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

22.

तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

23.

नव्या वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
सुखांचा झरा तुमच्या जीवनात वाहो
नवीन वर्ष शुभेच्छा

24.

💫🍁नव्या इच्छा नवी उमेद
मनात एक स्वप्न नवंसं नवं वर्ष
नव्या वर्षाचं स्वागत
नव्या अंदाजाने करा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💫🍁

25.

💫🍁इडा, पीडा टळू दे
आणि नवीन वर्षात
माझ्या मित्रांना
काय हवं ते मिळू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💫🍁