आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकार गांभीर्याने घेतले नाही, तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या,अन्यथा विष पिऊन मरू द्या,

असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की,”महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणाऱ्यांनी शेकडो वर्षे समाजाच्या प्रश्नांना झुलवत ठेवले आहे.

मराठा समाजातील तरुणांना गृहित धरुन शेकडो वर्षे सत्तेच्या पदांवर बसणाऱ्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला.इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधाने करणारे व कायदेशीर बाजू पुरेपूर लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मात्र मेखा मारुन बसले आहेत.”

“अलिकडे होत असणाऱ्या बैठकांमध्येही मला फारसे गांभीर्य दिसत नाही,” असंही खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. उदयनराजे पुढे म्हणाले, आजपर्यंत ४० पेक्षाही जास्त मराठा बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान दिले आहे.

आरक्षणासाठीचा रस्त्यावरचा संघर्ष देशाने पाहिलाय. मात्र, कोणालाही याचं गांभिर्य नाही. आरक्षणाच्या या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सरकारने केलेली कार्यवाहीही सदोष होती,

कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल, तर आदेशाच्याविरोधात रिव्ह्युव पीटिशन का दाखल केले नाही? असा सवाल त्यांनी उपास्थित केला.

राज्य सरकारमध्ये बसलेले मराठा आरक्षणासंदर्भात किती उदासिन आहेत हे जनतेच्या लक्षात येते. त्यामुळे राज्यकर्त्यांबाबत मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.

उद्या या तरुणांनी कायदा हातात घेतला, संहार घडवला, रक्तपात केला तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24