अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखाना सोनई यांना सन २०२०-२१ या गळीत हगांमास २८०० रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून निवेदन देण्यात आले.
मागील आठवड्यात भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ऊस भाव वाढीसाठी उपोषण करण्यात आले होते.मागील गळीत हंगाम मोठा झाला असून साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती पण चांगल्या प्रमाणात झाली आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार एफआरफीप्रमाणे कारखान्याने २१०० रुपये भाव अदा केला असला तरी भार्गव कमिटीच्या निकषानुषार उपपदार्थ निर्मितीतून पन्नास टक्के नफ्यातून शेतकरी सभासद वर्गाला २८०० रुपये ऊसदर अदा करण्यात यावा,
या मागणीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप किसान मोर्चाचे कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, येत्या आठ दिवसात मुळा कारखान्याच्या चेअरमन,
व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक व व्यवस्थापनाने २८०० रुपये भाव देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा भाजप किसान मोर्चाच्या वतीने मुळा कारखान्याच्या गेटवर १२ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला